पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील           

0
6

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सद्य:स्थितीत सोलापूर विद्यापीठाच्या कोंडी ता. उत्तर सोलापूर या परिसरात उभारण्यात येत आहे. या परिसरात मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही सर्व कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कामकाजाचा आढावा घेताना मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीस प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

पुतळा व संबंधित कामांच्या पाहणीसाठी पुढील आठवड्यात विद्यापीठात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन पुतळे उभारता आल्यास दोन पुतळे असणारे सोलापूर विद्यापीठ राज्यामध्ये पहिले असेल. या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधी खर्च करुन नवीन निधीसाठी मागणी नोंदवावी. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. महानकर यांनी कामाची माहिती दिली.

0000

निलेश तायडे/विसंअ/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here