नाशिक, दि. 2 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध होण्यासाठी विविध प्रकारची विकास कामे केली जात आहेत. या उपलब्ध झालेल्या सुविधा व वास्तू यांचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजिक, चंद्र सुर्य मंदिर मरळगोई रोड व भरवस फाटा येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी महेश पाटील, बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप, डॉ.श्रीकांत आवारे, मंगेश गवळी, सीताराम आंधळे, सरपंच काशिनाथ माळी, सचिन दरेकर, निवृती जगताप, उपसरपंच लतिफ तांबोळी, माधव जगताप यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, ६ कोटी ७० लक्ष निधीतून लासलगाव बसस्थानकाची पुनर्बांधणी लवकरच करण्यात येईल. सोळा गाव पाणी पुरवठा योजनेसाठी २१ कोटी रुपये निधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आले आहे. पाणी हा अतिशय महत्वाचा विषय असून कुणीही पाण्यावाचून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तालुक्यातील विविध गावांमधील तलाठी व मंडळ कार्यालयांच्या उभारणीसाठी निधी मंजूर झाला असून ती कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शिवनदीचे सौंदर्यीकरणासाठीही १५ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आला असून नागरिकांनी हा परिसर स्वच्छ राहील यादृष्टीने लक्ष देणे गरजेचे आहे. घरकुल योजनेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी आहे. त्यामुळे एकही नागरिक घरकुलांपासून वंचित राहणार नाही यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत वेळोवेळी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिले.
लासलगाव रेल्वे उड्डाणपुल, लासलगाव विंचूर रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे. तसेच पिंपळस ते येवलापर्यंत चौपदरीकरण रस्त्याचे काँक्रीटीकरण यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
लासलगांव पोलीस स्टेशन इमारत बांधकामाची मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी
मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी निफाड तालुक्यातील लासलगाव पोलीस स्टेशन इमारत बांधकामाची यावेळी पाहणी केली. सदर इमारतीचे काम येत्या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करावे. तसेच इमारत सौंदर्यीकरणाचे कामही उत्तम रीतीने करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक भास्कर शिंदे, पोलीस उप निरिक्षक अशोक मोकळ, प्रविण उदे आदि उपस्थित होते.
या विकास कामांचे झाले भूमीपूजन
पिंपळगाव नजिक
1) लासलगांव ते पाटोदा रस्ता रामा ४५२, किमी ०/०० ते ४/०० रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.४ कोटी, )
2) मुलभूत सुविधा अंतर्गत मुस्लिम वस्ती रजानगर येथे रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१५ लक्ष)
3) मुलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.२० लक्ष)
4) मुलभूत सुविधा अंतर्गत बहुउद्देशिय इमारत बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.२५ लक्ष)
5) आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१० लक्ष)
6) आमदारांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत शास्त्रीनगर येथे पिठाची गिरणी ते वाहेगांव रस्ता खडीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१० लक्ष)
7) बोथरा यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१० लक्ष)
8) शास्त्रीनगर येथे मुलभूत सुविधात॔र्गत गावांतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.२० लक्ष)
9) सामाजिक न्याय अंतर्गत सिद्धार्थनगर येथे सभामंडपाचे बांधकाम करणे कामाचे भुमीपुजन (र.रु.१५ लक्ष)
10) सामाजिक न्याय अंतर्गत अनुसूचित जाती वस्तीमध्ये रस्ता कॉक्रिटीकरण करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.१० लक्ष)
11) रजा नगर व श्रमिक नगर येथे समाजकल्याण, अल्पसंख्यांक विभाग अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण व अनुषांगिक भुमिगत गटार बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २० लक्ष)
12) तलाठी व निवासस्थान इमारत बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु.३० लक्ष)
13) पिंपळगांव नजिक ते तालुका हद्द ते वाहेगांव रस्ता ग्रामा ७५ किमी ०/०० ते २/५०० ची सुधारणा करणे कामाचे भुमीपूजन (कॉंक्रिटीकरण ४०० मीटर. व डांबरीकरण ६०० मीटर. ) (र.रु. ९० लक्ष)
चंद्र सुर्य मंदिर मरळगोई रोड
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनतील चंद्र सुर्य मंदिर ते मरळगोई बु. रस्त्याची सुधारण करणे, किमी 0/00 ते2/200 (र.रू. 153.29 लक्ष)
भरवस फाटा, ता.निफाड
1) निमगांव वाकडा ते भरवसफाटा ते देवगांव प्रजिमा १८, किमी ५ ते १० ची सुधारणा करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. २५० लक्ष)
2) तलाठी कार्यालय इमारत-निवासस्थान इमारत बांधकाम करणे कामाचे भुमीपूजन (र.रु. ३० लक्ष)
३) प्रजिमा-६९ पाचोरे खु. मरळगोई वाहेगांव रस्ता प्रजिमा-१२७ किमी २/०० ते ७/६०० ची सुधारणा करणे कामाचे लोकार्पण. (र.रु. १९० लक्ष)
000000