संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजना मान्यता

0
44

मुंबई, दि.५ : मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना राबविण्यास मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांचे बंजारा समाजाच्या वतीने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आभार मानले आहेत.

मंत्री श्री.राठोड यांनी म्हटले आहे की, राज्यात संत सेवालाल महाराज बंजारा, लमाण तांडा समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या योजनेत तांड्यांमध्ये प्राथमिक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी तांडा भागासाठी किमान एक हजार इतकी लोकसंख्या आणि दोन गावांतील तीन किलोमीटर अंतर असणे आवश्यक आहे. यातील ही दोन गावांतील तीन किलोमीटर अंतराची अट शिथील करण्यात येईल. या योजनेसाठी पाचशे कोटीं रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असून, ही समिती बंजारा, लमाण तांडा घोषित करणे, गावठाण जाहीर करणे, तांड्यांना महसुली गाव घोषित करणे तसेच ग्रामपंचायत स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करणे या अनुषंगाने कार्यवाही करेल.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here