मुंबई, दि. १५ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले असून, समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद फुलझेले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव म्हणून केलेलं काम सर्वांच्या स्मरणात राहील. नागपूर दीक्षाभूमीसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी, सच्चे अनुयायी अशी त्यांची ओळख होती. सर्वसामान्य कुटूंबातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण आयुष्य त्यांनी समाज हितासाठी वाहिलं. त्यांचे विचार, कार्य सदैव स्मरणात राहील.