सातारा दि.११: सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक संचनालयाच्यावतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवानिमित्त महाराष्ट्राचा इतिहास युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज यांनी केले.
भव्य दिव्य राजधानी गौरव सोहळ्याचे आयोजन येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर करण्यात आले. याचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले तहसीलदार नागेश गायकवाड, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, या सांस्कृतिक महोत्सवाचे कार्यक्रम 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्याचे निर्देश होते. वेळ फार कमी होता तरीही जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये उत्कृष्टरित्या कार्यक्रम आयोजित केले. याबद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुकही केले. सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. हा जिल्हा राज्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील प्रयत्नशील असून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे सहकार्य करावे,असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
प्रास्ताविका जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले की, राजधानी महासंस्कृती महोत्सवाचे कमी कालावधीत उत्कृष्ट आयोजन केले आहे. हा सोहळा ५ ते ११ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रसह देशाचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी येत आहे.
गौरव सोहळ्यामध्ये 215 कलाकारांनी सहभाग नोंदवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या गौरव सोहळा कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई यांचे कुटुंबीय, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००