माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

सोलापूर, दि. २३ : माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्यांचा आणि माझा ३५ वर्षांपेक्षा अधिक काळाचा परिचय होता. मराठी भाषा सर्वत्र पसरावी, प्रभावी ठरावी, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते एक जवळचे अनुयायी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवक्ता म्हणून आम्ही काम केले. त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, सैनिकी शाळा, बचतगटांना चालना याचबरोबर महिला आरक्षणाबाबतही आग्रही भूमिका घेतली, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

०००