प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत

0
10

नागपूर,दि. 04 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी 10.15 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेच्या हेलिकॅाप्टरने अदिलाबादकडे प्रयाण केले.

आगमनप्रसंगी आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार आदी यावेळी उपस्थित होते.

******

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here