ठाणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारावे – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

0
5

मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात यावे. हेलिपॅडचे काम दर्जेदार असावे. अत्यावश्यक काळात या हेलिपॅडचा उपयोग सहजरित्या करता आला पाहिजे. हेलिपॅडला संरक्षण भिंत निर्माण करुन हेलिपॅडसाठी उच्च प्रतीच्या पेव्हर ब्लॉकचा उपयोग करण्यात यावा. तसेच आजुबाजूला डांबरीकरण करावे, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे हेलिपॅड निर्मितीबाबत बैठकीचे आयोजन मंत्री श्री. देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.

हेलिपॅडसाठी शासकीय जमीन शोधून त्याच ठिकाणी काम सुरू करावे. ज्या तालुक्यात गायरान जमीन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी पुढील एक महिन्यात हेलिपॅडचे काम सुरू करावे. ज्या तालुक्यात हेलिपॅड उभारणी होणार नाही, संबंधित तालुक्याच्या प्रांताधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

0000

निलेश तायडे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here