नवीन वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगलीदि. 7, (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीतून सांगली पोलीस दलाला एकूण नवीन २२ वाहने प्राप्त झाली आहेत. यामुळे पोलीस विभाग अधिक सक्षम होईल. या वाहनांमुळे कायद्या व सुव्यवस्था राखण्यास निश्चित मदत होईल. असा आशावाद पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्‍त केला.

        जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटीलआमदार अरुण लाडआमदार सुधीर गाडगीळआमदार सुमनताई पाटीलआमदार मानसिंगराव नाईकजिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधीपोलीस अधिक्षक संदीप घुगे,

         जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलासाठी एकूण 22 वाहने तर पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून 10 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटीलसत्यजित देशमुख यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000