आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ भारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतीय वन सेवेतील कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आणि वन सेवेत कांदळवन कक्षामध्ये काम करत असतांना कांदळवनांचे पर्यावरणीयदृष्ट्या महत्व तसेच कांदळवनांच्या जतन व संवर्धनासाठीचे प्रयत्न याबाबत ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्रीमती पाटील यांची मुलाखत शनिवार दि. 9 आणि सोमवार दि. 11 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार दि. 9 मार्च 2024  रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR