३९ – बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकाशन पारदर्शक निवडणुकीसाठी संदर्भिका महत्त्वपूर्ण : जिल्हाधिकारी

0
10

        बीड, दि. 17 मार्च (जिमाका) :-जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते 39 – बीड लोकसभा मतदार संघाच्या संदर्भिकेचे प्रकशन आज झाले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी यासाठी ही संदर्भिका महत्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

आज पत्रकार परिषदेपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संदर्भिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव,   उपजिल्हानिवडणूक अधिकारी  महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.

ही संदर्भिका जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली असून यामध्ये भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, बीड जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी 18 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम, निवडणुकीदरम्यान बनलेल्या  विविध समित्या त्यांचे नोडल  अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक दिलेले आहे.

एक जानेवारी 2024 च्या आकडेवारीनुसार बीड लोकसभा निवडणूक मतदार संघामध्ये एकूण मतदारांची आकडेवारी, विधानसभा मतदारसंघ व तालुका निहाय मतदार केंद्र,  मतदान केंद्राची माहिती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, माध्यम  प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज, राज्य समितीची तसेच जिल्हास्तरीय समितीची रचना यासह बीड लोकसभा मतदारसंघात आतापर्यंतचे खासदार, 1952 पासून ते 2019 पर्यंत निवडून आलेले खासदार यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. ही पुस्तिका निवडणुकी कालावधीत पत्रकारांना विशेषतः उपयोगी असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाल्या.

 

00000

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here