सातारा दि.17: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे. निवडणुकांची घोषणा केल्यापासून तीन दिवसाच्या आत जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 याच्या कलम 127-क च्या आवश्यकता निदर्शनास आणणारी आणि कोणतेही उल्लंघन केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
कोणत्याही व्यक्तीला, त्याच्या दर्शनीभागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाहीं अथवा मुद्रित किंवा प्रकाशित करवता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीला निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रके ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे याबद्दलचे स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तोशः ओळखतात अशा दोन व्यक्तीनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दिल्याशिवाय; आणि तो दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रकाने त्या कागदाच्या एका प्रतीसह अधिकथनाची एक प्रत जिल्हा दंडाधिकाऱ्याला, पाठविल्याशिवाय मुद्रित करता येणार नाही किंवा मुद्रित करवता येणार नाही.
या कलमाच्या प्रयोजनार्थ, कागदपत्र हाताने नकलून काढण्याच्या प्रक्रियेतून अन्य कोणतीही अनेक प्रती काढण्याची प्रक्रिया म्हणजे मुद्रण असल्याचे समजण्यात येईल आणि ” मुद्रक” या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावला जाईल आणि “निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रक “याचा अर्थ, उमेदवाराच्या किंवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीचे प्रचालन करण्यासाठी किंवा निवडणुकीला बाधा आणण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रीत पत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तिफलक असा होतो, पण निवडणूक सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर तपशील किंवा निवडणूक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच्या सूचना जाहीर करणारी हस्तपत्रके, घोषणाफलक किंवा भित्तिपत्रक यांचा समावेश होत नाही.
जी व्यक्ती, पोट-कलम (1) किंवा पोट-कलम (2) मधील कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.
कोणत्याही निवडणुकीची पत्रके, भित्तीपत्रके व त्यांनी मुद्रीत केलेले असे अन्य साहित्य यांच्या मुद्रकांची व प्रकाशकाची नावे, पत्ते ठळकपणे दर्शनी भागात स्पष्टपणे दर्शविण्यासाठी त्यांना विशेषकरून सुचविले पाहिजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 यांच्या कलम 127 अ (2) अन्वये, आवश्यक असल्याप्रमाणे मुद्रीतसाहित्याची व प्रकाशकाच्या घोषणापत्राची प्रत मुद्रकाने 3 दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिका-यास पाठवावयाची आहे. या विषयावरील तपशीलवार सूचना, आयोगाच्या पत्र क्रमांक 3/9 (3 एस008)/94, जे एस-दोन, दिनांक 2 सप्टेंबर 1994 (जोडपत्र डी-2) मध्ये अंतर्भूत केल्या आहेत, जिल्हा निवडणूक अधिका-यास मुद्रणालयाकडून कोणतेही पत्रक किंवा भित्तिपत्रक, इत्यादी मिळाल्या बरोबर प्रकाशकाने व मुद्रकाने कायद्याचे व आयोगाच्या निदेशाचे पालन केले आहे किवा कसे याची तपासणो करण्यात येवून त्याची एक प्रत, कार्यालयाच्या सूचना फलकावर सुद्धा लावण्यात येईल म्हणजे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व अन्य इतरसंबंधित व्यक्ती, कायद्याच्या शर्तीचे पालन करण्यात आले आहे किंवा कसे हे तपासू शकतील, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी कळविले आहे.
0000