निवडणूक कामकाजासाठी नियुक्त असलेल्यांना रोकड विरहीत वैद्यकीय उपचार सुविधा पुरवा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

0
7
सातारा दि.21 (जिमाका) :निवडणुकीच्या दरम्यान मतदान अधिकारी/कर्मचारी (Polling Personnel) यांना सोईसुविधा व कल्याणकारी उपयायोजना करण्यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कामासाठी नियुक्त केलेले मतदान अधिकारी/कर्मचारी (Polling Personnel) यांच्याकरीता निवडणुकीच्या दरम्यान दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ रोकड विरहित वैद्यकीय उपचार सुविधा पुरविण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या या सूचनांचे तंतोतंत पालन करुन लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता नियुक्त केलेले मतदान अधिकारी/कर्मचारी (Polling Personnel) यांच्याकरीता रोकड विरहित वैद्यकीय उपचार (Cashless Treatment) सुविधा पुरविण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here