लोकसभेला दिव्यांग व वृध्द मतदारांचे घरातूनच मतदान

0
10

ठाणे, दि.27 (जिमाका) :- आगामी लोकसभा  निवडणुकीसाठी 40 टक्के अपंगत्व  (Locomotive)  व 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करता येणार. मात्र ही बाब अनिवार्य  नसून अधिकची सुविधा म्हणून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे इच्छुक मतदारांनी 12 D फॉर्म पाच दिवसात भरून द्यायचे आहेत. त्यापैकी पात्र मतदारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देतील.

ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण ८५+ वर्षावरील ५९ हजार ४ मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.

ठाणे जिल्ह्यातील 85 वर्ष वयावरील मतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती पुढीलप्रमाणे-

विधानसभा मतदारसंघ- 134 भिवंडी ग्रामीण (अज) पुरुष- 1 हजार 50, महिला-   1 हजार 531, एकूण- 2 हजार 581

विधानसभा मतदारसंघ- 135 शहापूर (अज) पुरुष- 1 हजार 508, महिला-  2 हजार 3, एकूण- 3 हजार 511

विधानसभा मतदारसंघ- 136 भिवंडी पश्चिम, पुरुष- 1 हजार 162, महिला-   1 हजार 118, एकूण- 2 हजार 280

विधानसभा मतदारसंघ- 137 भिवंडी पूर्व, पुरुष- 363, महिला-  337, एकूण- 700

विधानसभा मतदारसंघ- 138 कल्याण पश्चिम, पुरुष- 2 हजार 14, महिला- 1 हजार 623, एकूण- 3 हजार 637

विधानसभा मतदारसंघ- 139 मुरबाड, पुरुष- 2 हजार 111, महिला- 2 हजार 285, एकूण- 4 हजार 396

विधानसभा मतदारसंघ- 140 अंबरनाथ (अजा) पुरुष- 1 हजार 645, महिला-   1 हजार 398, एकूण- 3 हजार 43

विधानसभा मतदारसंघ- 141 उल्हासनगर,  पुरुष- 1 हजार 37, महिला-1 हजार 49, एकूण- 2 हजार 86

विधानसभा मतदारसंघ- 142 कल्याण पूर्व, पुरुष- 1 हजार 66, महिला- 964, एकूण- 2 हजार 30

विधानसभा मतदारसंघ- 143 डोंबिवली,  पुरुष- 2 हजार 634, महिला-   1 हजार 934, एकूण- 4 हजार 568

विधानसभा मतदारसंघ- 144 कल्याण ग्रामीण, पुरुष- 1 हजार 575, महिला- 1 हजार 272, एकूण- 2 हजार 847

विधानसभा मतदारसंघ- 145 मीरा भाईंदर, पुरुष- 2 हजार 640, महिला- 2 हजार 410, एकूण- 5 हजार 50

विधानसभा मतदारसंघ- 146 ओवळा माजिवडा, पुरुष- 2 हजार 164, महिला- 1 हजार 572, एकूण- 3 हजार 736

विधानसभा मतदारसंघ- 147 कोपरी-पाचपाखाडी, पुरुष- 1 हजार 461, महिला- 1 हजार 265, एकूण- 2 हजार 726

विधानसभा मतदारसंघ- 148 ठाणे, पुरुष- 2 हजार 817, महिला- 2 हजार 450, एकूण- 5 हजार 267

विधानसभा मतदारसंघ- 149 मुंब्रा-कळवा, पुरुष- 1 हजार 999, महिला- 1 हजार 620, एकूण-3 हजार 619

विधानसभा मतदारसंघ- 150 ऐरोली, पुरुष- 1 हजार 343, महिला- 1 हजार 134, एकूण- 2 हजार 477

विधानसभा मतदारसंघ- 151 बेलापूर, पुरुष- 2 हजार 597, महिला- 1 हजार 853, एकूण- 4 हजार 450

अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष  व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या-31 हजार 186, महिला मतदारांची संख्या-27 हजार 819 असे 85 वर्ष  व त्याहून अधिक वय असलेल्या एकूण मतदारांची संख्या 59 हजार 4 इतकी आहे, अशी माहिती ठाणे उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी दिली आहे.

000000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here