मुंबई, दि. ९ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांची मुलाखत घेण्यात आली आहे.
ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मंगळवार १४ मे, २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक रोशन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
धुळे जिल्ह्यातील मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज निर्भय व निरपेक्ष पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृतीबाबत राबविलेले उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकांतील मतदारांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा याविषयी धुळ्याचे जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे.
००००
संध्या गरवारे/विसंअ