मुंबई, दि. १३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील ३०- मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील १८०- वडाळा विधानसभा मतदारसंघामधील १०० वर्षाच्या श्रीमती पार्वती शेषानंद यांनी गृह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी गृह टपाली मतदान प्रक्रियेविषयी प्रत्यक्ष पाहणी करुन सर्वसाधारण निरीक्षक जी. एस. प्रियदर्शी यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात आज ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार असे १२४ मतदारांच्या घरोघरी जावून मतदान घेण्यात आले. या सर्व मतदारांनी मा. भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या गृह टपाली मतदान प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/