मुंबई, दि.१६ : नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांची ‘लोकसभा निवडणूकीसाठी नाशिक जिल्हा सज्ज’ या विषयावर दिलखुलास कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली आहे.
ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.निवेदक शैलेश माळोदे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यात असलेले मतदारसंघ, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर असलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन याविषयी नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी माहिती दिली आहे.
००००