मुंबई, दि. 12 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो 300’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले.
राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर पुस्तके छापता येणार आहेत.
तंत्रज्ञान सर्वांकरिता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींकरिता वरदान सिद्ध होत आहे. मात्र दिव्यांगांना नोकरी व्यवसायाकरिता आज नवनवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे. या दृष्टीने त्यांना कौशल्याबाबत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.
दिव्यांगांना ज्ञान व कौशल्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑडिओ पुस्तके तयार केली पाहिजेत तसेच ती स्वस्त व सहज उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत असे राज्यपालांनी सांगितले.
नॅब इंडिया संस्थेने दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे व सर्वोत्कृष्ट दिव्यांग सहायता केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी केले.
यावेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
‘नॅब’ संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम तसेच इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या मार्श इंडिया, एचएसबीसी व कन्सर्न इंडिया फाऊंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती देणाऱ्या एका माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले, कार्यवाहक मानद महासचिव डॉ. विमल कुमार डेंगला, सचिव हरेंद्र मल्लिक, कार्यकारी संचालक पल्लवी कदम तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समिती सदस्य, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.
००००
Maharashtra Governor inaugurates Braille Printing Machine for visually impaired
Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated ‘Braillo 300’, a modern Braille Printing Machine at the headquarters of the National Association for the Blind India at Worli, Mumbai on Wed (12 Jun).
The machine purchased by NAB India from the discretionary funds made available by the Governor will be used for printing text books, novels, religious books, cards and other reading material.
The Governor felicitated the visually impaired students who scored more than 80 per cent marks in the SSC Board examinations. Teachers were also felicitated on the occasion.
The Governor felicitated the CEO of Marsh India Sanjay Kedia, HSBC representative Roopa Varma and CEO of Concern India Foundation Kavita Shah for supporting the structural repairs, painting and installation of Solar panels of NAB building.
A documentary film on NAB India was released on the occasion.
President of NAB India Hemant Takle, Acting Honorary Secretary General Dr Vimal Kumar Dengla, Honorary Secretary Harendra Mallik, Executive Director Pallavi Kadam, Committee members and office bearers of NAB were present.
0000