राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली ,दि. १९ : महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

याप्रसंगी श्री. बैस यांनी प्रधानमंत्री श्री. मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केली.

०००