आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्राध्यापक डॉ. वृषाली उजेडे यांची उद्या मुलाखत              

मुंबईदि. 20 :योग’ अभ्यास ही भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. दरवर्षी 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग‘ दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय (आयु)वरळीयेथील स्वस्थवृत्त व योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापकडॉ. वृषाली उजेडे यांची विशेष मुलाखत दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय योग‘ दिवस आणि जागतिक संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योग‘ अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. तर माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी संगीत फायदेशीर आहे. कोविडनंतर योगचे महत्त्व वाढले असून केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी राहण्यासाठी योगची मदत घेत आहेत. योग साधना आणि संगीत यांचे मानवी जीवनातील महत्व आणि योगाचे विविध प्रकारसंगीत थेरपी आशा महत्वपूर्ण विषयावर दिलखुलास‘ कार्यक्रमातून डॉ. उजेडे यांनी माहिती दिली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवारदि. 21, शनिवार दि. 22 आणि सोमवार दि. 24 जून 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 21 जून 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. प्राध्यापक डॉ. सचिन उपलंचीवार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR           

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR