सातारा दि. २५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक पी.बी. देशमाने, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य संजय मांगलेकर, जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार, योगेंद्र सातपुते आदी उपस्थित होते.
युवकांनी करिअरसाठी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात प्राविण्य मिळावावे. युवकांनी आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घ्यावा, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.
000
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून प्रशिक्षणासाठी शेतकरी केले मार्गस्त
सातारा दि. २५: शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे तांत्रिक मार्गदर्शन करणेसाठी डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विदयापीठ, दापोली येथे बांबू लागवडीबाबतचे प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखून या प्रशिणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे वाहन मार्गस्थ केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय माईनकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
बांबू लागवडीच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने पहिल्या टप्पयात 55 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रशिक्षणासाठी दापोली येथे गेले आहेत.