विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळितपणे सुरु झाली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत झालेल्या मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे – कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २२३४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६३२० इतकी आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ७.३० इतकी आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १२०७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या १२६३५ इतकी आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी १०.४६ इतकी आहे

मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या ११८८ इतकी आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ७.५० इतकी आहे

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या ६१८२ इतकी आहे.सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी ८.९१  इतकी आहे.

००००

वंदना थोरात/विसंअ