विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीची अकरा वाजेपर्यतची मतदान आकडेवारी

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या  द्वैवार्षिक निवडणूकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली असून सकाळी ११ वाजेपर्यंतची आकेडवारी पुढीलप्रमाणे –

कोकण पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या २,२३,४०८ असून मतदान केलेल्यांची संख्या ४५,०१० इतकी आहे. सकाळी ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी  २०.१५ इतकी आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ एकूण मतदार संख्या १,२०,७७१ असून मतदान केलेल्यांची संख्या ३२६२२ इतकी आहे. सकाळी  ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २७.०१ इतकी आहे

मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या १५,८३९ असून मतदान केलेल्यांची संख्या २,९००  इतकी आहे. सकाळी  ११ वाजेपर्यंतची मतदानाची  टक्केवारी  १८.३० इतकी आहे

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ एकूण मतदार संख्या ६९,३६८ असून मतदान केलेल्यांची संख्या १६,०६९  इतकी आहे. सकाळी  ११  वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी २३.१६  इतकी आहे,असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांनी कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ