मुंबई, दि.१:- महाराष्ट्रातील कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. स्व. नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या राज्यातील शेतकरी तसेच कृषी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय अशा सर्वांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आदींनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.