मुंबई, दि. 5 : पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय आहे. राज्यातील पर्यटन व्यवसाय वाढावा आणि पर्यटनातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी विशेष अभ्यासक्रमही सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेवून विद्यार्थ्यांनी पर्यटन व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाव्यवस्थापक श्री. जयस्वाल यांची मुलाखत सोमवार, दि. 8 आणि मंगळवार दि.9 जुलै 2024, रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि.9 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
०००
केशव करंदीकर/विसंअ/