विधानपरिषद कामकाज :

शिक्षकांसाठीच्या टप्पा अनुदानाची अंमलबजावणी जूनपासून – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १२ : शालेय शिक्षण विभागाच्यावतीने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या  टप्पा अनुदानाचा अमंल हा  जून महिन्यापासून सुरु होईल. असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

या संदर्भात निवेदन करताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.

जून ते डिसेंबरचा फरक हा ज्या वेळी टप्पा अनुदान दिला जाईल,  त्यावेळी या फरकासह ते देण्यात येईल. त्याचबरोबर  शाळांची पटसंख्या बघून उर्वरित शाळा स्वयं अर्थसहाय्यितामध्ये टाकत आहेत. हे करत असताना ही  डोंगरी  भागातील शाळांसाठीची २० ची अट शिथिल करुन १५ विद्यार्थी संख्या करत आहोत. त्याचप्रमाणे अल्पसंख्याकांची संख्या खूप कमी असल्याने अल्पसंख्याकांच्या शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात विद्यार्थी संख्या मिळत नसल्याने त्यांची ३० ही संख्या २० वर करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. केसरकर यांनी निवेदनाद्वारे दिली.

0000