मुंबई, दि. 25 :- राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे. धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Home वृत्त विशेष नदी, नाले, ओढे. धरण, धबधब्यांसारख्या पूरस्थिती असलेल्या भागात जाणे टाळण्याचे उपमुख्यमंत्री अजित...
ताज्या बातम्या
मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांचे नवीन कार्यालय मरीन ड्राईव्ह येथे
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३० : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार...
भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी भायखळा विधानसभा मतदारसंघातील प्रौढ आणि दिव्यांग मतदारांना गृह टपाली मतदानासाठी २५ पथके गठित करण्यात आली आहे....
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई शहरातील १७८-धारावी, १७९-सायन-कोळीवाडा, १८०-वडाळा, १८१-माहिम आणि १८२-वरळी...
निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
Team DGIPR - 0
मुंबई, दि. ३० :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात...
निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा
Team DGIPR - 0
मुंबई दि 29:- वर्सोवा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 164 मधील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला.
या मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मतदान होण्यासाठी...