मुंबई, दि. २५: राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने उद्या शुक्रवार, दि. २६ जुलै 2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे सकाळी १० वाजता सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. आयोगाकडे निवेदने सादर केलेल्या संघटनांच्या पाच ते सहा सदस्यांनी कागदपत्रे व पुराव्यांसह सुनावणीस उपस्थित रहावे, असे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्य सचिव यांनी कळविले आहे.
राज्यातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सूर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, कलवार, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत आयोगाकडे निवेदने प्राप्त झाली आहेत. त्या अनुषंगाने या सुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी या msbccpune@gmail.com ई मेल वर आणि 020 – 26053056 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ