मुंबई, दि.११ : वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग व आयुष संचालनालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अवयवदान दिन ०३ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त अवयवदान जनजागृती प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रभातफेरी सकाळी ८ वाजता नरिमन पॉईंट (NCPA समोर) ते यशवंतराव चव्हाण सेंटर पर्यंत होणार आहे .
आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग भारत सरकार व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय, दंत व आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, पथनाट्य, प्रभातफेरी इत्यादींचा यामध्ये समावेश होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर दिपक केसरकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे व वैद्यकीय शिक्षण व आयुषचे आयुक्त राजीव निवतकर यांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
0000
राजू धोत्रे/विसंअ