संत गाडगेबाबांची ‘दशसूत्री’ मंत्रालयात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

0
11

मुंबई, दि. 12 : संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ केले.

संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार आपले सरकार काम करेल आणि या दशसूत्रीचा फलक मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथील अधिवेशनात केली होती. त्यानुसार या मार्बल शिळेत कोरलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.

भुकेलेल्यांना अन्न; तहानलेल्यांना पाणी; उघड्यानागड्यांना वस्त्र; गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत; बेघरांना निवारा, आश्रय; अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार; बेरोजगारांना रोजगार; पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना अभय; गरीब तरुण तरुणींचे लग्न; दुःखी व निराशांना हिम्मत या बाबी दशसूत्रीमध्ये नमूद आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here