‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’; ४ लाभार्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश

0
17

जळगाव दि. ( जिमाका ) :  मुख्यमंत्री यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने  पालकमंत्री गुलाबराव  पाटील, यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत 4 लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते कार्य प्रशिक्षण आदेश  देण्यात आले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य निवड झालेले उमेदवार खालील आस्थापनांवर रुजू झालेले आहेत. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, जळगाव, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, जळगाव, मौलाना आझाद, अल्पसंख्यांक महामंडळ, जळगाव या कार्यालयांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अधिकाधिक शासकीय व खाजगी आस्थापना /महामंडळे/उद्योजक यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयाशी समन्वय साधून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी केले.

०००

‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानां’तर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव येथे १३ ऑगस्टला कार्यक्रम; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

जळगाव दि. (जिमाका): राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘ मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण ‘ योजनेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सागर पार्क जळगाव येथे १३ ऑगस्ट रोजी भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला बहिणींनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

या संदर्भात जिल्हा नियोजन विभागाच्या बैठक कक्षात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आ.सुरेश भोळे, आ. चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 5,33,959 एवढ्या बहिणींचे अर्ज आले होते. त्यापैकी 5 लाख 9 हजार 366 एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. त्याची प्रोसेस सुरुच राहणार आहे. प्रत्येक तालुक्यातून या कार्यक्रमासाठी भगिनी येणार आहेत. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी संबंधित यंत्रणेनी घ्यावी. कार्यक्रमस्थळी पाण्याची योग्य ती सोय करण्यात यावी. त्या दिवशी पाऊस असण्याची शक्यता लक्षात घेवून  सभा मंडपाची सोय केली आहे. अधिकाधिक  वाहनतळ तेही सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावीत असे जिल्हा पोलीस प्रशासनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here