मुंबई, दि.३० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले राजकोट येथे भारतीय नौदलामार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय नौदलाचे तज्ज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
या समितीमध्ये सदस्य संजय दशपुते, सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, विकास रामगुडे, सहव्यवस्थापकीय संचालक एमएसआयडीसी, मुंबई, प्रा.जांगीड, आय.आय.टी , मुंबई, आणि प्रा. परीदा, आय.आय.टी, मुंबई यांचा समिती सदस्यांत समावेश आहे.
ही समिती किल्ले राजकोट, जि. सिंधुदुर्ग येथे भारतीय नौदलामार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्घटनेची नेमकी कारणीमीमांसा शोधणे आणि या दुर्घटनेमागील दोषी निश्चित करणे याबाबींवर विचार करुन शिफारशी सादर करेल.
०००
वंदना थोरात/विसंअ