महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमूर्ती खरेदी करा – पालकमंत्री अब्दुल सत्तार

0
8

छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)- यंदा गणेशोत्सवात गणेश भक्तांनी ‘उमेद’च्या बचत गटांच्या महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्ती खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

गणेशोत्सव २०२४ साठी ‘उमेद’ स्वयंसहायता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारुन त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्याच्या उद्देशाने बचतगटांनी तयार केलेल्या गणेशमुर्तींची विक्री करण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या संकल्पनेतून सलग दुसऱ्या वर्षीही श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी ग्राम ,तालुका व जिल्हा पातळीवर स्टॉल उभारण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त दिलीप  गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपायुक्त  सुरेश बेदमूथा, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन प्रभोदय मुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) ओम प्रकाश रामावत, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ सुरेखा माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मग्रारोहयो अनुपमा नंदनवनकर, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, गट विकास अधिकारी प्रकाश नाईक, उषा मोरे, मीना रावताळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, जिल्हा व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक विभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे तसेच जिल्हा परिषदेचे  कर्मचारी, तालुक्याचे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते.

श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कौतुक केले.  स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या श्री गणेश मूर्ती नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी तर सूत्रसंचालन सुप्रिया साळुंके यांनी केले.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here