आदिवासी विकास विभागातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
13

मुंबई, ‍‍दि. ९ :  आदिवासी विकास विभागातील गट – क संवर्गातील विविध रिक्त पदांकरिता २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एसईबीसी संवर्गाचा समावेश करून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते. त्यामुळे पूर्वीची जाहिरात स्थगित करण्यात आली होती. आता विभागातील बिंदुनामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार ६१६ पदांच्या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल आणि विभागातील गट – क संवर्गातील भरती प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.

वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल – मुख्य लिपिक, आदिवासी विकास निरिक्षक, वरिष्ठ लिपिक – सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (पुरुष), अधिक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/ मुख्य लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक (वरिष्ठ), सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, कॅमेरामन – कम – प्रोजेक्टर ऑपरेटर, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक ही  गट – क संवर्गातील विविध पदे विभागात भरण्यात येणार आहेत.

०००

शैलजा पाटील/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here