बोरा बाजार येथील रस्त्याचे ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ नामकरण करण्यात यावे -विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर

0
11

मुंबई, दि. १० : मुंबईतील फोर्ट येथील बोरा बाजार जवळील मार्गाचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.

कुलाबा विधानसभा क्षेत्रातील बोरा बाजार, फोर्ट येथे प्राचीन असे श्री शांतीनाथ श्वेतांबर जैन देरासर मंदिर आहे. श्वेतांबर जैन भाविकांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र असे धार्मिक स्थळ असून येथे वर्षभर श्रद्धाळू आणि भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. फोर्ट विभागातील रहिवाशांची या विभागातील रस्त्याचे नामकरण ‘शांतीनाथ देरासर मार्ग’ असे करण्यात यावे, अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. जैन बांधवांची ही मागणी लक्षात घेता तातडीने याबाबतचा निर्णय घेण्यात यावा, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here