केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी घेतले श्री गणेश दर्शन

मुंबई, दि. 14 : केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी  विराजमान श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले.

यावेळी केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार मिलिंद देवरा, आमदार आशीष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आदी मान्यवर  उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/