विकासात्मक कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप

0
41

बांधकाम कामगारांना सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप

नागपूर, दि. 29 – राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आणल्या आहेत. हे सरकार लोकाभिमुख काम करीत आहे. एकीकडे आपण विकासाची गती कायम राखली असून दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. विकास कामांबरोबरच सर्वसामान्यांचे जीवनमानही उंचावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

खामला येथील शांतीनिकेतन कॉलनी मैदान आणि हावरापेठ येथे बांधकाम कामगार मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षाकवच कार्ड, संसार व सुरक्षा किटचे वाटप यावेळी करण्यात आले. बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव, स्थानिक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता दोन कोटी वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहेत. एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली आहे. तर दुसरीकडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली. यामाध्यमातून अठराव्या वर्षापर्यंत  मुलीला टप्प्याटप्प्याने  1 लाख रुपये मिळणार आहेत.

बांधकाम कामगार मंडळाच्या अंतर्गत विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ कीट वाटप किंवा पाच हजार रुपये एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. नोंदीत बांधकाम कामगारांच्या  मुलांना शिक्षण, उपचार, विमा, घर बांधकामासाठी अनुदान या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. भविष्यात सर्व योजना बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदणी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

समाजातल्या मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीयांपर्यंत आपल्याला मुलभूत सोईसुविधा आणि सेवा कशा पोहोचवता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे करीत असताना सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण वैष्णवी बावस्कर यांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here