राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा भंडारा जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद, टसर सिल्कच्या उत्पादनांची घेतली माहिती

0
57

भंडारा दि. 30: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज भंडारा जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन आणि प्रमुख उत्पादनांबाबत विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या विकासविषयक अपेक्षा, समस्या व संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले.या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्ह्याचा ऐतिहासीक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थिती व  उद्योग व जिल्हा विकास आराखड्यानुसार विकासाचे नियोजनाचे सादरीकरण जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

राज्यपाल यांच्याशी चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, वरिष्ठ संपादक, औद्योगिक संघटनाचे प्रतिनिधी, आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी, उमेद व अंगणवाडी  महिला प्रतिनिधी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांचेशी संवाद साधला. यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त विपीन इटनकर, जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपवनसंरक्षक राहूल गवई यांसह वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर प्रामुख्याने जिल्ह्यात सुरू असलेली आणि भविष्यात आवश्यक असलेली विकास कामे, राष्ट्रीय महामार्ग व शहरातील वाहतुकीशी संबंधित बाबी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करणे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन, वैद्यकीय महाविद्यालय, तसेच वाळू उपसा, शैक्षणिक क्षेत्रातील समस्या आदी प्रमुख विषय मांडण्यात आले. तसेच उद्योग विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास, उद्योगांच्या समस्या, पर्यटन विकासासाठी सुविधांचा विकास, वैनगंगा नदीचे प्रदुषण, तसेच लाख व  शिंगाडा उत्पादन, यासारखे विषय मांडण्यात आले.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सर्व गटांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

जिल्ह्यातील महीला बचत गटांच्या चळवळीविषयी तसेच टसर, कोसा आणि अन्य रेशीम उत्पादनाच्या बाबत त्यांनी समाधान व्यकत केले.तसेच मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महीला बचतगटाचे कौतुक केले.

भंडारा जिल्हा नैसर्गिक साधनसंपदेने नटलेला आहे. तरी या नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित सेवा- उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here