मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, प्रशासकीय इमारत (डेअरी विभाग), पहिला मजला, अब्दुल गफारखान मार्ग, वरळी सी फेस, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, सदस्य गोरक्ष लोखंडे, वैदेही वाढाण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, आदिवासी विकास विभागाचे सचिव, पोलीस महासंचालक आदी उपस्थित असणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर यांनी कळविले आहे.
****
शैलजा पाटील/विसंअ/