सातारा दि.१२- २५६ वाई विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महाबळेश्वर येथे विधानसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी सायकल व बाईक रॅली काढण्यात आली. प्रशासनातर्फे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व लोकांमध्ये लोकशाहीचे महत्त्व वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वीप नोडल अधिकारी, मुख्यलिपिक आबाजी ढोबळे, कर निरीक्षक अमित माने, अंतर्गत लेखापाल, सचिन कदम, स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार, मुख्याध्यापक परमेश्वर माने यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर शहरात सायकल बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थी सहभागी होते. रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


000