नागपूर, दि. १५: महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे राज्य मंत्री परिषदेची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात नवनियुक्त सदस्य मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.
या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोकप्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला.