‘जय महाराष्ट्र’ व ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘विकासपर्वाचे शंभर दिवस’

मुंबई,दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’आणि’दिलखुलास’कार्यक्रमात’विकासपर्वाचे शंभर दिवस’या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे.या कार्यक्रमात द फ्री प्रेस जर्नलचे राजकीय संपादक संजय जोग,दै.लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान व दै.सकाळचे मुख्य प्रतिनिधी संजय मिस्कीन यांचा सहभाग असलेली मुलाखत  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि.10 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होईल. तर’दिलखुलास’कार्यक्रमात मंगळवार दि. 10 आणि बुधवार दि. 11  मार्च रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत तसेच प्रसारभारतीच्या’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही प्रसारित होणार आहे. निवेदक  नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना व त्यासंदर्भात घेण्यात आलेले निर्णय,शेतकऱ्यांचे  आर्थिक जीवनमान उंचावणे यासाठी शासनाकडून होणारे प्रयत्न,उद्योग क्षेत्रासाठी घेतलेले गेलेले महत्त्वपूर्ण निर्णय,महसूल विभागाने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय,शिवभोजन  योजनेची अंमलबजावणी,मराठी भाषेला  अभिजात दर्जा देणे यासंदर्भात होत असलेली कार्यवाही,सामाजिक न्याय  विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेले निर्णय,या विषयांवरील सविस्तर चर्चा श्री.जोग,श्री. प्रधान व श्री.मिस्कीन  यांनी’जय महाराष्ट्र’आणि’दिलखुलास’कार्यक्रमात केली आहे.