मुंबई, दि. ३० : माहिती तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य या विभागाचा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात पदभार घेतला.
पदभार स्वीकारण्यापूर्वी मंत्री ॲड. शेलार यांनी मंत्रालय येथील छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दालन क्रमांक 401 मध्ये जाऊन पदभार स्वीकारला.
यावेळी माहिती तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक कार्य या दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
000