मुंबई, दि. 2 : मुंबई शहर व परिसरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 6 जानेवारी रोजी मंत्रालय येथे ही बैठक होणार आहे.
प्रदूषण कमी करणे यासह प्रदूषण नियंत्रणासाठी करावयाच्या विविध उपाययोजना या विषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येणार आहे.
०००००
हेमंतकुमार चव्हाण/विसअं