क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३: पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनीही पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी डॉ. कांबळे यांनी उपस्थित महिलांना पुष्प देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, अवर सचिव सचिन कावळे, एससी/ एसटी कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.

०००

श्रीमती श्रद्धा मेश्राम/स.सं.