शंभर दिवसात करावयाच्या कामांचा कृती कार्यक्रम तयार करा – मंत्री भरत गोगावले

फलोत्पादन विभागाची आढावा बैठक

मुंबई, दि. ३: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषगाने कार्यक्रम निश्चित करावा अशा सूचना फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. मंत्रालयात झालेल्या फलोत्पादन विभागाच्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

फलोत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे सांगून फलोत्पादन मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, राज्यात अनेक पिकांना भौगोलिक मानांकन प्राप्त आहे. त्यामुळे फलोत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. योजनेसाठी केंद्र सरकारकडून अधिकचा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचा पाठपुरावा करावा. कोकणात हळदी सारखी पिके घेतली जातात त्यामध्ये वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना श्री. गोगावले यांनी दिल्या.

बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ