बारामती, दि. ०५: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जलसंपदा विभागाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे आयोजित महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जलसंपदा विभागाअंतर्गत महामंडळस्तरीय क्रिकेट स्पर्धेला २०१८ पासून सुरुवात झाली आहे. खेळामध्ये यश -अपयश येते त्यामुळे सर्व खेळाडूंनी सांघिक भावना अंगिकारून क्रीडावृत्ती दाखवून उत्तम पद्धतीने खेळ खेळावे.
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत पुणे पाटबंधारे मंडळाच्यावतीने पुरुष व महिलांच्या क्रिकेट सामन्याचे ५ ते ७ जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ७ पुरुष व १२ महिला संघानी सहभाग घेतला आहे.
०००