नाशिक, दि.23 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): केंद्र शासन व सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक राज्यातील शहरांमध्ये शिल्प समागम मेळाचे आयोजन केले जात आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, स्वच्छता मित्र कर्मचारी, विमुक्त जमती व मागासवर्गीय प्रवर्गातील करागीरांना रोजगार मिळून त्यांनी तयार केलेल्या उत्पादितांना हक्काची बाजारपेठ मिळून त्यांच्या कलात्मक गुणांना उभारी मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
आज शहरातील डोंगरे वसतिगृह मैदानात शिल्प समागम मेळा 2025 च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स ॲण्ड डेव्हलमेंट कॉरपोरेशनचे मुख्य व्यवस्थापक सुरेश कुमार व अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, शिल्प समागम मेळा प्रदर्शनात एकूण 100 स्टॉल्स लावलेले आहेत. येथे आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या दहा राज्यातील कारगीर हे त्यांनी तयार केलेल्या अनेक गृहपयोगी व कलाकुसरीच्या वस्तू विकण्यासाठी आलेले आहेत. नाशिककरांनी या मेळाव्यास भेट कुटुंबासह भेट द्यावी, असे आवाहनही सामाजिक न्याय मंत्री श्री. आठवले यांनी केले.
ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठीही अशा प्रदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून त्यांच्याही जगण्यास बळ मिळत आहे. अनुसूचित जाती, स्वच्छता मित्र कर्मचारी, विमुक्त जमती व मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे, स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून आपले ध्येय गाठावे, असेही मार्गर्शन केंद्रीय मंत्री श्री. आठवले यांनी केले.
यावेळी सामूहिक न्यृत्य व गायन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादकरीकरण झाले.