नवी दिल्ली, दि. ३१: साहित्य अकादमीने मान्यता दिलेल्या २४ भारतीय भाषांमधील दरवर्षी दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.
साहित्य अकादमीने पहिल्यांदाच लेखक, प्रकाशक आणि त्यांच्या हितचिंतकांकडून वर्ष २०२५ च्या मुख्य पुरस्कारासाठी २४ भाषांमधील पुस्तके निवडण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुस्तके सादर करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२५ आहे.
२०२५ च्या पुरस्कारांसाठी १ जानेवारी २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांची एक प्रत अर्ज भरून विचारार्थ पाठवता येईल.
याबद्दलची सविस्तर माहिती अकादमीच्या https://sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती देशभरातील 24 भाषांमधील पोहचविण्याचे आवाहन सचिव के. श्रीनिवासन यांनी या प्रसिद्धी प्रत्रकाद्धारे केले आहे.
०००