पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्धाटन संपन्न

धुळे, दिनांक 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागण्यासाठी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जिल्हा नियोजन भवनमधील तळमजला येथे पालकमंत्री यांचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्धाटन संपन्न झाले.  यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा नियोजन अधिकारी छ. रा. कनगरे यांचेसह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000